‘बॉलिवूडला टार्गेट केले जात आहे, हा न्याय आहे का?’; आर्यन खान प्रकरणी अभिनेत्री संतप्त

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर टीका करताना दिसतात तर काहीजण आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका घेताना दिसतात. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जीने आर्यन खानला पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे.

तनिषाने नुकतीच एका मुलाखतीत ‘मला असे वाटत आहे की आर्यन खानचा छळ होत आहे. एका मुलाला मीडिया ट्रायलमध्ये अडकवले जात आहे. ही खरी पत्रकारिता नाही, हे खळबळजनक आहे आणि बॉलिवूडला टार्गेट केले जात आहे. दुर्दैवाने लोक कलाकारांवर टीका करत आहेत’ असे वक्तव्य करत संताप व्यक्त केला आहे.

पुढे तनिषा म्हणाली, ‘हा देश सर्वांचा आहे आणि या देशातील लोकांनी पुरावे पाहून आपले विचार मांडायला हवेत. जर हे त्यांच्या मुलासोबत घडले तर? तेव्हा आपण काय करु? हा न्याय आहे का?’ असा सवालही तनिषाने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा