बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफचे निधन

मुंबई: सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सहर अली हिचे सोमवारी मुंबईत निधन झाले. सहरच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे तिला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने तिची प्राणज्योत मालवली आहे.

दिग्दर्शक नीरज उधवानीने सांगितले की सहरच्या किडणीने काम करणे बंद केले होते. 8 दिवसांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच, अभिनेत्री स्वरा भास्करने सहरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत लिहिलेय, ‘मी तुला खूप त्रास द्यायची. कारण तू मला किती आवडायची, हे मी तुला सांगू शकत नव्हते’. सहरच्या निधनावर बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

सहरने तिच्या करिअरमध्ये द बेस्ट एग्जॉटिक मेरीगोल्ड होटल, दुर्गामती-द मिथ, मान्सून शूटआऊट,मिलियन डॉलर आर्म, शकुंतला देवी आणि लंच बॉक्ससारख्या अनेक वेबसीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम होते होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा