‘आर्यन खानची केस पाहून बॉलिवूड स्टारकिड्स भारत सोडण्याच्या निर्णयावर’

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी अटक आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर टीका करताना दिसतात तर काहीजण आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका घेताना दिसतात. यादरम्यान अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने एक अजब दावा केला आहे.

अभिनेता केआरके आपल्या अजब दाव्यामुळे चर्चेत असतो. आता देखील त्याने आर्यन खान संबंधित एक ट्विट करत अजब दावा केला आहे. कमाल खानने असा दावा केला आहे की, ‘ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानला अटक झाल्यानंतर माझ्या सूत्रांनुसार अनेक सेलिब्रिटी किड्स भारत सोडण्याचा वियार करत आहेत. जर आर्यन खानच्या बाबतीत असे घडू शकते, तर ते कोणासोबतही होऊ शकते, असे त्यांना वाटत आहे,’ असं ट्विट केआरकेने केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी केआरकेने राहुल गांधी यांना देशाचा पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केआरकेचे हे ट्विट सुद्धा वाऱ्यासारखे काही वेळातच पसरले होते. केआरके नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतो त्याच्यावर अनेक कलाकारांनी मानहानीचा दावा देखील केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा