InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बॉम्बस्फोटातील आरोपींना तिकीट म्हणजे लोकशाहीवर हल्ला- शरद पवार

- Advertisement -

मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकिट दिलं जाणं ही बाब गंभीर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर टीका केली आहे.

बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तिकिट देणं हा तर लोकशाहीवरचा हल्ला आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

खुनाचा आरोप, मालेगाव बॉम्बस्फोट खटला असे गंभीर खटले असणारेही काहीजण असे आहेत ज्यांना तिकिट मिळालं. या प्रकरणांमध्ये काहींची चौकशीही सुरू आहे तरीही तिकिट कसं दिलं जातं? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असणाऱ्या एक भगिनी आमच्या शेजारी बसणार आहेत असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अल्पसंख्यांक समाजाची मुले पकडण्यात आली. ही बाब मला समजली नाही. शुक्रवार होता, त्यात नमाज सुरु असताना त्याच समाजातील मुलं मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतील यावर माझा विश्वास बसला नाही जे पकडले गेले त्यांची सुटका झाली पाहिजे अशीही अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. देशात सध्या सांप्रदायिक विचारांचा ज्वर पहायला मिळतो आहे. दिल्ली आणि संसदेत तो पहाण्यास मिळतो आहे, सामाजाला एकसंध न ठेवणारी विखारी पद्धत संसदेत बघायला मिळते आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.