InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण करणार बोनी कपूर

खास कपूर कुटुंबातील तरूण पिढीला समोर आणण्यासाठी बॉलिवूडमध्ये मिस्टर इंडियासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे बोनी कपूर चित्रपटाच्या दिग्दर्शनात उतरणार आहेत. त्यांनी ही माहिती गोव्यात सुरू असलेल्या ‘इफ्फी’ महोत्सवात दिली.

धडक मधून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेता म्हणून अर्जुन कपूरनेही बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण केली आहे. अर्जुन आणि जान्हवीला घेऊन आता भाऊबहिणीच्या नात्यावर आधारित एका चित्रपटाचे दिग्दर्शन बोनी कपूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय कपूर यांच्याही मुलांचा त्यांच्या आगामी चित्रपटात समावेश राहणार आहे. बोनी कपूर यांच्या आगामी चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, यात कपूर कुटुंबातील स्टारकिड्स दिसतील एवढे नक्की.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply