InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ऑलिंपिक पदक मिळविण्याचा बोपन्नाला विश्‍वास

- Advertisement -

भारताचे टेनिसमधील ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पुढील वर्षी टोकियोत साकार होऊ शकते, असा आशावाद दुहेरीतील यशस्वी टेनिसपटू रोहन बोपन्नाने व्यक्त केला आहे. आपली आणि दिवीज शरणची जोडी हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकते असे त्याला वाटते. बोपन्ना व शरण यंदाच्या वर्षाच्या आरंभी एकत्र खेळू लागले तेंव्हा 2020 टोकियो ऑलिंपिकसाठी तयारीचाच त्यांचा उद्देश होता. मात्र सहा स्पर्धाच एकत्र खेळल्यावर ते वेगळे झाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने खेळून आम्हाला खेळाडूं परिचयाचे झाले आहेत. त्यांच्या खेळाची शैली माहित आहे आणि जपानमध्ये खेळायला आम्हाला मजा येते. टोकियोत आम्ही जिंकलो आहोत. तेथील वातावरण आम्हाला आवडते आणि आशियात ऑलिंपिक होत आहे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे असे तो म्हणाला. पाकिस्तानमधील नियोजित डेव्हिस कप लढतीबद्दल बोपन्ना म्हणाला की, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून सुरक्षेचा घेतल्या जाणार्‍या आढाव्याची त्याला प्रतीक्षा आहे. चार नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ त्यांचा निर्णय जाहीर करणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.