दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय ; विनाकारण छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करु नका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. मराठा आरक्षण यश, अपयश बघण्यापेक्षा आता समाजाला आरक्षण कसं मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपलं अपयश झाकण्यासाठी जाणुनबुजून आधीच्या सरकारवर खापर फोडलं जात आहे. चुकीच्या बातम्या पसरवल्या जातायेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केला आहे.याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीवर आपण अडचणीत येतोय असं वाटल्यावर इतर गोष्टी काढायच्या, चुकीच्या बातम्या पसरवायच्या असं राजकारण केले जात आहे.

छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडू नका, दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय आहेत, ज्यावेळी मराठा मोर्चा मुंबईत आला होता. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळाशी सरकारचं बोलणं झालं. सरकारशी चर्चा झाल्यानंतर संभाजीराजेंनी मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर जाऊन सगळे निर्णय सांगितले. स्वत: मी मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा आभार मानताना मी संभाजीराजे आणि उदयनराजेंचे आभार मानले.

सातत्याने समाजाला एकवटून हा लढा योग्य तसा होईल यासाठी उदयनराजेंनी प्रयत्न केले आहेत. उदयनराजेंचाही मराठा लढ्यात मोठा वाटा आहे. या दोघांच्या मनातही नेतृत्वाबाबतचा वाद नसेल. त्यामुळे विनाकारण नेतृत्वाचा मुद्दा काढून छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंना फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.