निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे, त्यांच्यापासून खरा धोका, शिवसेनेचा इशारा

मुंबई : राज्य सरकारने विरोधी पक्ष आणि इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्या जिवाचं काही बरं-वाईट झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं भाजप नेते नारायण राणेंनी म्हटलं होतं. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे तर केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. मात्र कोणतंही सरकार असलं तरी राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसवलं. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असं वाटत होतं. मात्र त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत यांनी म्हणाले.

”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा राऊत यांनी दिला होता.

दरम्यान, विनायक राऊतांच्या या तिखट प्रतिक्रियेवर राणे कुटुंबातील कोण प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.