Box Office Released | आज बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यास सुसज्ज आहेत ‘हे’ 3 चित्रपट

मुंबई : नोव्हेंबर (November) महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी (Friday) बॉक्स ऑफिस (Box Office) वर 3 चित्रपट (Film) धुमाकूळ घालण्यास सुसज्ज झाले आहेत. आज 4 नोव्हेंबर 2022 रोजी बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कतरिना कैफ चा ‘फोन बूट’ जानवी कपूरचा ‘मिली’ आणि सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा ‘डबल एक्सल’ हे चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाले आहे. हे तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या संकल्पना वर आधारित असून या चित्रपटांकडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा आहेत.

‘फोन भूत’ चित्रपटाला बॉक्स ऑफिस (Box Office) वर मिळू शकते चांगली ओपनिंग

बॉलीवूड सुपरस्टार कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा फोन भूत चित्रपट अनेक दिवसापासून चर्चेत आहे. कतरिना या चित्रपटाच्या माध्यमातून दीर्घ विश्रांतीनंतर चित्रपटसृष्टी मध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांच्या रिलीज नंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. गुरमीत सिंग दिग्दर्शित फोन भूत या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ ‘भुत’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सिद्धांत आणि ईशान ‘ घोस्टबस्टर्स दिसणार आहे.

थ्रिलर सस्पेन्ससह ‘मिली’ देखील आज रिलीज होत आहे

जानवी कपूरचा थ्रिलर आणि सस्पेन्स मिली चित्रपट देखील आज प्रदर्शित होत आहे. मिली हा चित्रपट मल्याळम थ्रिलर ‘हेलन’चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री जानवी कपूर मिली नौडियाल या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये मिली आपल्या वडिलांसोबत एकटीच राहत असते. नंतर तिला परदेशी नोकरीची ऑफर येते आणि ती सर्व तयारी करून ती ऑफर स्वीकारून तिकडे जाते. आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये ट्विस्ट येतो, आणि थ्रिलर सस्पेन्स सुरू होतो. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज नंतर चाहते हा सस्पेन्स उघडण्याच्या आतुरतेने वाट बघत होते चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार असून या सस्पेन्सवरून पडदा उचलला जाणार आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सल’ चित्रपट देखील आज होत आहे रिलीज

बॉडी शेमिंगवर आधारित डबल एक्सल चित्रपट आज रिलीज होणार आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. डबल एक्सल या चित्रपटांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या समाजासाठी बारीक महिला म्हणजे सुंदर महिला असे मानले जाते त्यांच्यासाठी या चित्रपटामध्ये मोठा संदेश आहे. या चित्रपटासाठी दोन्ही अभिनेत्रीने त्यांचे वजन 15 ते 20 किलोने वाढवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.