Brahamastra | रणवीर आणि आलियाचा सुपरहिट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच होणार OTT रिलीज
मुंबई: रणवीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र Brahamastra चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ब्रह्मास्त्र चित्रपटाची चाहते आतुरतेने ओटीटी OTT वर रिलीज होण्याची वाट बघत होते. ब्रह्मास्त्र ने रिलीज होतात बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला होता. त्याचबरोबर प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले होते. त्याचबरोबर शानदार वीकेंडसह हा चित्रपट वीक डेज मध्ये सुद्धा चमकत होता.
दरम्यान ब्रह्मास्त्रच्या ओटीपी रिलीज बाबत एक मोठे अपडेट समोर आले असून, दिग्दर्शक अयान मुखर्जींनी ब्रह्मास्त्रच्या OTT रिलीजची घोषणा केली आहे. ब्रह्मास्र हा चित्रपट ऑनलाइन स्ट्रीमिंग प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.
या दिवशी ब्रह्मास्त्र होणार OTT रिलीज
रविवारी दि. 23 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज ची घोषणा करत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेट बद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे. हे सोशल मीडियाच्या पोस्ट वरून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यातील 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर यांनी देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर हीच पोस्ट शेअर केलेली आहे. ब्रह्मास्त्र च्या OTT रिलीज च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एक वेगळेच प्रकारची खळबळ उडाली आहे.
The World of Ancient Indian Astras is coming to Disney+ Hotstar on November 4. #BrahmastraOnHotstar pic.twitter.com/chmZBI6grk
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) October 23, 2022
बॉक्स ऑफिस वर अधिराज्य गाजवणारा चित्रपट
2022 हे वर्ष बॉक्स ऑफिस साठी थोडे वाईट ठरले होते. सुपरस्टार आमिर खानचा लाल सिंचन दादर अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज यासारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक वेळ चालले नव्हते. मात्र रणवीर कपूर आणि आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट हा या वर्षातील सर्वाधिक हिट हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर 250 कोटी म्हणून अधिक कमाई केली होती. तर या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात 400 कोटीहून अधिक कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND VS PAK | शमीची अप्रतिम कामगिरी! 5 चेंडूत 4 षटकार ठोकणाऱ्या इफ्तिखारला रोखले
- T20 World Cup | 2 वेळा T20 World Cup चॅम्पियन वेस्टइंडीज झाली वर्ल्ड कप मधून बाहेर, जाणून घ्या कारण
- India vs Pakistan | भारताने पाकिस्तानला 159 धावांवर रोखले, अर्शदीप-हार्दिकचा भेदक मारा
- Pravin Darekar | “…म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत”, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- India vs Pakistan । विराट कोहली पाकिस्तानची धुलाई करायला तयार, म्हणाला…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.