InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ब्राम्हण मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो – विनायक मेटे

- Advertisement -

आजवर राज्यात झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांना समाजाला आरक्षण देता आलं नाही, याच एक कारण म्हणजे इतर समाजाचा असलेला प्रभाव हे असू शकत. पण आता एक ब्राह्मण मुख्यमंत्रीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, अस वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केलं आहे.

पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारणीचे आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन झालं पाहिजे, हिंसा हा मार्ग असू शकत नाही. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी शिवाय न्यायालयात हे आरक्षण टिकू शकत नसल्याचं यावेळी मेटे म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं .

आगामी काळात सरकारसोबत रहायची की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठांच्या विरोधात असल्याचं अजिबात वाटत नाही. महायुतीममध्ये शिवसंग्रामवरच अन्याय झाला आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकार सोबत असल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.