Brahmi Oil | उन्हाळ्यामध्ये केसांना ब्राम्ही तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Brahmi Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair care) अधिक घ्यावी लागते. कारण सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही ब्राह्मी तेलाचा वापर करू शकतात. ब्राह्मी तेलाच्या मदतीने उन्हाळ्यामध्ये केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात. यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये ब्राह्मीचा अर्क मिसळून तेल तयार करू शकतात. हे तेल तुम्हाला कोमट करून केसांना लावावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे तेल केसांना लावावे लागेल. त्यानंतर सकाळी कोमट पाण्याने तुम्हाला तुमचे केस धुवावे लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाचा वापर केल्याने केसांना खालील फायदे मिळू शकतात.

केसांना पोषण मिळते (Hair is nourished-Brahmi Oil Benefits)

उन्हाळ्यामध्ये केस कोरडे आणि निर्जीव होतात. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही ब्राह्मी तेलाचा वापर करू शकतात. ब्राह्मी तेलामध्ये आढळणारे फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांना पोषण प्रदान करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या तेलाचा वापर केल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Brahmi Oil Benefits)

नियमित ब्राह्मी तेलाचा वापर केल्याने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या कूपांना पोषण प्रदान करतात. यासाठी तुम्हाला ब्राह्मी तेलाच्या मदतीने टाळूला मसाज करावी लागेल. याच्या नियमित वापराने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळतीची समस्या दूर होते.

कोंड्यापासून सुटका मिळते (Remove dandruff-Brahmi Oil Benefits)

तुम्ही जर केसातील कोंडाच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर ब्राह्मी तेलाचा वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये आढळणारे अँटिइफ्लेमेटरी आणि अँटिमाइक्रोबियल गुणधर्म केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या तेलाच्या मदतीने टाळूमध्ये येणारे खाज दूर होते.

उन्हाळ्यामध्ये ब्राह्मी तेलाचा वापर केल्याने केसांना वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही खसखसचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

मध आणि खसखस (Honey & Poppy Seeds-For Skin Care)

खडबडीत, निर्जीव आणि कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी मध आणि खसखस उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला खसखस बारीक वाटून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटात चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहते आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

दही आणि खसखस (Curd & Poppy Seeds-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खसखस आणि दह्याच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला खसखस बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दही मिसळून घ्यावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण चार ते पाच मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या वापराने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या