Breaking News | महाराष्ट्रात होणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात

Breaking News | मुंबई : काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशातच एक माहिती समोर आली आहे की, आणखिन एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात (Gujrat) राज्यात गेला आहे. यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं आलेलं पाहायला मिळतं आहे.

नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. हा प्रकल्प तब्बल 22 हजार कोटींचा असल्याचं समजतं आहे. या प्रकल्पाचे 30 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे म्हटले होते. परंतू आता हा प्रकल्प गुजारतला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वेदांता फॉक्सकॉनवरून राज्यात खूप गोंधळ झाला होता. फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील जवळपास दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता.परंतू तो प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर आता तब्बल 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट गुजरातला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय नेते यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.