Breking news : राज कुंद्राला न्यायालयाकडून 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या अटकेवर आज (23 जुलै) कोर्टाचा पुढील निर्णय आला आहे. कोर्टाने राज यांची पोलीस कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवली आहे. अश्लील चित्रपटांद्वारे मिळवलेले पैसे ऑनलाईन सट्टेबाजीसाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय आहे, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टाला केला आहे.

अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणात राज कुंद्राला सोमवारी (19 जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर 23 जुलैपर्यंत कोर्टाने राज यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. राजसोबत त्याचा साथीदार रायन थोरोपे हा देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्याच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज याला याबाबत विचारले असता तो म्हणाले की, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेलेले नाही.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

राज कुंद्रावर केवळ या अश्लील सामग्री बनवल्याच नाही, तर लोकांना काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा