InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी भक्त असल्यामुळे मुलीने लग्न मोडले!

उत्तर प्रदेश-  नवरदेव मुलगा मोदी भक्त असल्यामुळे मुलीने मोदी भक्त मुलाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे . लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलगा आणि मुलगी कुटुंबियांसमवेत जमले होते. लग्नाच्या विषयावर चर्चा सुरु असतानाच देशातील अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली. यावरून मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला.

नवरा मुलगा मोदी सरकारचे कौतुक करत होता. पण मुलीला हे मान्य नव्हते. ती मोदींना खोट ठरवत, देशासाठी किती चुकीचे निर्णय घेतले हे पटवून देत होती. वाद विकोपाला जाऊन मोदी समर्थक मुलगा चिडला आणि मोदींवरून झालेल्या वादात लग्न मोडले.

मुलगा हा उद्योगपतीचा मुलगा आहे तर तर मुलगी सरकारी शिक्षिका आहे. लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुलीने स्वतःच ठरलेलं लग्न मोडलं. लग्नासाठी मी माझे विचार बदलू शकत नाही, असं त्या मुलीने जाता जाता त्या मुलाला सांगितले.

दरम्यान, दोन्ही कुटुंबातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघही आपापल्या मुद्द्यांवर ठाम होते.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.