“भाऊचा पंगा, अमेरिकेत दंगा”; ‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र आता चक्क विनोदाची फटकेबाजी करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’मधील मंडळी परदेश दौरा करणार आहेत.

झी मराठीने नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यात भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके ही मंडळी विमानात बसलेली दिसत आहे. तर श्रेया बुगडे ही विमानाच्या मागे, तसेच सागर कारंडे हा विमानाच्या पंखांना लटकल्याचे बघायला मिळत आहे. “भाऊचा पंगा, अमेरिकेत दंगा; चला हवा येऊ द्या, वऱ्हाड निघालयं अमेरिकेला,” असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यात भात सोंगणी अंतिम टप्प्यात
त्यासोबतच या व्हिडीओला “वऱ्हाड निघालं अमेरिकेला, नवीन पर्व ६ डिसेंबरपासून,” असे कॅप्शन देण्यात आले आहे. झी मराठीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ६ डिसेंबरपासून ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व सुरु होत आहे. या नवीन पर्वात नवीन काय बघायला मिळणार यासाठी सर्वच प्रेक्षक प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या