‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’

पुणे : पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करत या कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय. बिबवेवाडी परिसरात एका मुलीचा नात्यातील तरुणाने कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. क्षितीजा व्यवहारे (वय १४) असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे.

याबाबत माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. यानंतर अखेर १२ तासांच्या आता या हत्या प्रकऱणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या घटनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यात घडलेली हि घटना अत्यंत निंदनीय आहे. माणूसकीला काळीमा फासणारी आहे.

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल. असे आवाहन अजित पवार यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा