BSF Recruitment | भारतीय सुरक्षा दलामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

BSF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सीमा सुरक्षा दल (Border Security Force) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

बीएसएफ (BSF Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 247 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) – 217 पदे आणि हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) – 30 पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (BSF Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती मोहीमेमध्ये (BSF Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)

https://rectt.bsf.gov.in/

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.bsf.nic.in/

महत्वाच्या बातम्या