BSF Recruitment | BSF मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

BSF Recruitment: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (BSF Recruitment) या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 26 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये HC (पशुवैद्यकीय), कॉन्स्टेबल (केनलमन) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

बीएसएफ (BSF Recruitment) यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://bsf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

HOW TO APPLY BSF?  अर्ज कसा करायचा ?

भारत सरकारच्या (BSF Recruitment) या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असावे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवाराला 100 रुपये फी भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://bsf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.