InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

देशात कुठेही फोन करा आणि कितीही बोला,

“बीएसएनल यूझर्ससाठी अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल व्हॉईस कॉल प्लॅन बाजारात आणण्याचा विचार करत आहे. बीएसएनएलवरुन इतर कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर कॉलसाठी ही सुविधा असेल. त्याचबरोबर 149 रुपये किंवा त्याहून कमी दरात डेटाही उपलब्ध करुन देण्याचीही कल्पना आहे.”, अशी माहिती बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.

“2018-19 या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मिळवू, अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे येत्या काळात भारतातील टॉप-3 टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये बीएसएनएल असेल”, असेही श्रीवास्तव म्हणाले.

बीएसएनएलच्या प्रगतीबद्दल सांगताना श्रीवास्तव म्हणाले, “एकेकाळी बीएसएनल क्रमांक एकची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी होती. मात्र, त्यानंतर सहाव्या स्थानावर घसरली. मात्र, आता पुन्हा एकदा बीएसएनएलने भरारी घेतली असून, चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.”

देशभरात आजच्या घडीला एकूण सेलफोन यूझर्सपैकी 10 टक्के यूझर्स बीएसएनएलचे ग्राहक आहेत. ही आकडेवारी 10 टक्क्यांहून 15 टक्के करण्यासाठी बीएसएनएलचे प्रयत्न सुरु आहेत.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.