Budget 2019 – घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं फसवे आर्थिक ‘बजेट’

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार, मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून एकप्रकारे निवडणुकीसाठी मतांची पेरणीच केली आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नोकरदार, शेतकरी आणि कामगार वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.

अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून पाडला आहे. मात्र, या बजेटमधील घोषणांसाठी सरकार पैसा कुठून आणणार असा प्रश्न अर्थतज्ज्ञ शंकर अय्यर यांनी विचारला आहे. कारण, या घोषणेनंतर सरकारला दिवसाला 1 हजार 928 कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागणार आहे.

मोदी सरकार आता दिवसाला 7627 कोटी रुपये खर्च करेल आणि सरकारचे उत्पन्न असेल दिवसाला 5414 कोटी. म्हणजेच सरकारला दर दिवसाला 1 हजार 928 कोटी रुपये कर्ज काढावं लागणार आहे, असे अर्थतज्ज्ञ शंकर अय्यर यांनी एका वेबसाईट दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

Loading...

या अर्थसंकल्पात सरकारने दावा केला की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. पण ही वस्तुस्थिती नाही. आपले हे अपयश झाकण्यासाठीच सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली. वर्षाला ६ हजार रूपये म्हणजे महिन्याला ५०० रूपये होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने केलेली ही मदत अत्यंत निरर्थक असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.

Budget 2019: या वर्षी सरकारने खूप मोठे गाजर आणले आहे – अजित पवार

मोदी सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. प्रत्येक वर्षी तीच तीच आश्वासनं सरकार देत आहे. या आधी छोटी छोटी गाजरं वाटली, पण या वर्षी सरकारने खूप मोठे गाजर आणले आहे, जे फसवे आहे’, अशा शब्दात अजित पवारांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली. मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी यांनी बोचरी टीका केली.

Budget 2019 – पाच वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा

केंद्रातल्या मोदी सरकारने आज आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात जुमले देऊन, अतिरंजीत दावे करून आणि फसव्या घोषणांचा पाऊस पाडून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातून गरिब माणसाच्या पदरी निराशाच आली असून शेतक-यांची तर क्रूर थट्टा केली आहे. हा अर्थसंकल्प नव्हे तर पाच वर्षातील नाकर्तेपणा झाकण्यासाठी तयार केलेला मोदींचा जुमलेनामा आहे अशी घणाघाती टीका खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Budget 2019; दिवसाला १७ रु. ही तर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा- राहुल गांधी

शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणून ज्या तरतुदींची अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली, त्यावर गांधी यांनी सडकून टीका केली. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. यावर वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दिवसाला अवघे १७ रुपये शेतकऱ्याला देणे म्हणजे त्याची क्रूर थट्टा असल्याची टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केलं

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. या अर्थसंकल्पातून देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. अस मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. सेवा क्षेत्राला चालना मिळाल्यामुळे येत्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय हा दूरदर्शी अर्थसंकल्प होता, यातून नवा भारत निर्माण होईल, या बजेटने नवीन योजनेला जन्म दिला असून शेतकऱ्यांना मदत दिली गेली आणि सहा हजार वर्षाला दिले जाणार आहेत असंही ते म्हणाले

Budget 2019: हा हंगामी ‘अर्थसंकल्प’ फक्त ट्रेलर आहे – मोदी

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. हा हंगामी अर्थसंकल्प फक्त ट्रेलर आहे. निवडणुकीनंतर आम्ही भारताला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ असे मोदी म्हणाले. गरीबांना शक्ती देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा आणि श्रमिकांना सन्मान देणारा हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्था आणि देशाचा विश्वास बळकट करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या पुढच्या दशकभराच्या गरजा लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून देशातील १३० कोटी जनतेला ऊर्जा मिळेल. हे सर्वव्यापी, सर्वसमावेशक बजेट आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणूकपूर्व हंगामी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

मोदी सरकारच्या गतवर्षीचे उत्पन्न आणि खर्च यामधील तूट मोठी आहे. उत्पन्न आणि खर्चातील तुटीचे अंतर 3.3 टक्के अपेक्षित होतं. मात्र, 30 नोव्हेंबर 2018 च्या आकडेवाडीनुसार सरकारने ही मर्यादा केव्हाचीच ओलांडली आहे. सरकारच्या खर्चाचा आकडा 7 लाख 16 हजार 625 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या आर्थिक तुटीनुसार हा खर्च केला असता तर 6 लाख 24 हजार 276 कोटी रुपये खर्च झाले असते. म्हणजेच, चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सरकारने 114 टक्के रक्कम अधिक खर्च केली आहे.

अर्थसंकल्पामधील मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा ठरली ती म्हणजे पाच लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न. गोयल यांनी ही घोषणा करताच लोकसभेत भाजपा खासदारांनी ‘मोदी मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.