InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Budget 2019: मध्यमवर्गीयांसाठी सवलत; ४५ लाखाच्या घर खरेदीवर दीड लाखाची सूट

45 लाखांपर्यंत घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीड लाख रुपयांची सूट देण्यात येणार. तसेच गृह कर्जावरील व्याजदरात मिळणारी सूट 2 लाखांहून 3.5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचसोबत इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा आलेलं मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार, कृषी या क्षेत्रातील आव्हानाला सामोरे जात सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply