InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Budget 2019: मोदी सरकारची शेतकऱ्यांना निरर्थक मदत; खात्यात फक्त ६ हजार जमा

केंद्रातील मोदी सरकार आज अंतरिम बजेट (Interim Budget 2019) सादर झाले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्या ऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर बजेटची जबाबदारी दिली होती.

मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा बजेट आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बजेट सादर केला. पियुष गोयल यांनी सकाळी ११ वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली. पाच लाख रुपयांपर्यंत करमुक्ती आणि शेतकऱ्यांना महिन्याला ५०० ते ६०० रुपये थेट बँक खात्यात, हे दोन या बजेटं वैशिष्ट्य राहिले.

या अर्थसंकल्पात सरकारने दावा केला की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. पण ही वस्तुस्थिती नाही. आपले हे अपयश झाकण्यासाठीच सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली. वर्षाला ६ हजार रूपये म्हणजे महिन्याला ५०० रूपये होतात.

त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने केलेली ही मदत अत्यंत निरर्थक असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.

अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर घाणेरडी टीका….

‘…म्हणूनच सरकार दात नसलेल्या वाघांना पोसतंय का?’

आगामी मंत्रीमंडळ विस्तारात माळी समाजाला मंत्रीपद देणार – पंकजा मुंडे

Budget 2019: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खात्यात दरवर्षी ६ हजार जमा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.