InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Budget 2019: अंतरिम बजेटविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत शुक्रवारी १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०१९-२० मधील आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्याच्या काही तासानंतर, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अॅडव्होकेट मनोहरलाल शर्मा यांनी बजेटविरोधात याचिका दाखल केली आहे. संविधानात अंतरिम बजेटसारखं कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे हे बजेट रद्द करा, अशी मागणी अॅडव्होकेट मनोहरलाल शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात केली.

याचिकाकर्त्यांच्या मते, संविधानात केवळ पूर्ण बजेट आणि लेखानुदान ताळेबंद सादर करण्याची तरतूद आहे. लेखानुदान हे निवडणूक वर्षापुरतं मर्यादित असून, सरकारी खर्चाच्या पूर्ततेसाठी घेण्यात आलेली मंजुरी असते, तर पूर्ण बजेट हे निवडून आलेलं नवं सरकार सादर करतं.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.