InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Budget 2019: सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणारी घर बांधणार

सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. सर्वानं हक्काचं घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यापूर्वीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचं बजेट सादर करत आहेत. यावेळी कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय, या घरांमध्ये गॅस, विज आमि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply