Budget Session | आशिष शेलार- धनंजय मुंडे यांच्यात तुफान खडाजंगी; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विधानसभेत पुन्हा राडा
Budget Session | मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून सभागृहामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन टीका-टिपण्णी आरेप-प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना सत्ताधारी पक्षांतील आमदार, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुनही सभागृहामध्ये मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं. विधानसभा अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्याने सातत्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खडसावल्याचंही आपण पाहिलं आहे.
आजही 20 मार्च पुरवणी मागणीवर चर्चा सुरू असताना मंत्री उपस्थित नव्हते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चांगलेच आक्रमक झाले. तेव्हा धनंजय मुंडे आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात खडाजंगी झाली.
“सरकार एवढा हलगर्जीपणा करत असेल, तर…”
“अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, मागण्यांवर चर्चा सुरु आहे. तरी, मंत्री अनुपस्थित आहेत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. सरकार एवढा हलगर्जीपणा करत असेल, तर 12 कोटी जनतेला काय देणार आहे,” असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभेत कृषी, महसूल आणि अन्य विभागांवर चर्चा होणार होती. पण, त्या विभागाचे मंत्री हजर नसल्याने धनंजय मुंडे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. “आज कृषी, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, महसूल विभागावर चर्चा होणार आहे. मग, या सर्व विभागेच मंत्री सदनात असायला हवेत. फक्त कृषी आणि वैद्यकीय शिक्षक याव्यतिरिक्त कोणताही मंत्री सदनात दिसून येत नाहीत”, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना सभागृहात अनुपस्थित मंत्र्यांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार @dhananjay_munde यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर दिले. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @mieknathshinde @Dev_Fadnavis #MahaBudgetSession2023 #Mumbai pic.twitter.com/RBZwPBiiIN
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 20, 2023
“विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा कार्यक्रम घोषित केला होता, तेव्हा धनंजय मुंडे असते, तर ही आदळाआपट करावी लागली नसती. विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलेल्या कार्यक्रमात मुंबईची चर्चा होणार होती. त्यानंतर पुरवणी मागण्यांवर चर्चा होती”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य
- Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक
- Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका
- Braking | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत
- Weather Update | राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
Comments are closed.