Budget Session 2023 | “त्यांचं सरकार होतं तेव्हा माझ्या…”; पत्नीबाबत देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक खुलासे

Budget Session 2023 | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. राजकीय आणि मनोरंजन क्षेत्राबाबत त्या नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आज विधानसभा सभागृहामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Files FIR Against Designer

“अमृता फडणवीस यांनी एक एफआयआर दाखल केला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करण्याकरता प्रयत्न झाला. आधी पैसे देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. अनिल जयसिंघांनी नावाची व्यक्ती गेली सात आठ वर्षे फरार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. या व्यक्तीची एक मुलगी 2015 ते 2016 दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर भेटणे बंद झाले आणि अचानक या मुलीने माझ्या पत्नीला भेटणे सुरु केले. त्यावेळी तिने मी डिझायनर असल्याचे सांगितले. त्यासोबत तिने माझी आई वारली असून मी तिच्यावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन तुम्ही करा असे माझ्या पत्नीला सांगितले.”

Devendra Fadnavis Allegations काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मला याची हिंट अनेकांनी दिली होती. की, तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे.पण याबाबचे सर्व पुरावे हातात आले आहेत. तो व्यक्ती गेली 6 वर्षे झाले फरार आहे. तो व्यक्ती हातात आला असता तर त्याचा मास्टरमाईंड आहे हे समजलं असतं. त्या व्हिडीओमधील अनेक बड्या नेत्यांसोबत त्या व्यक्तीचे संभाषण आहे.”, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना फडणवीसांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता गंभीर आरोपही केले आहेत.

“विश्वास संपादित केल्याने त्या मुलीने काही दिवसांनी तिने येणे जाणे चालू केले. ती मुलगी अमृता फडणवीस यांच्याकडे डिझायनर कपडे घेऊन यायला लागली. एक दिवस हळूच तिने सांगितले की माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा. माझ्या पत्नीने याबाबत निवेदन देण्यास सांगितले.”, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.

Shocking revelations of Devendra Fadnavis about his wife

“सरकार बदलल्यानंतर तिने माझ्या वडिलांना फसवल्याबद्दल सांगितले. काही दिवसांनी तिने सांगितले की माझे वडील सगळ्या बुकीजना ओळखतात. मागच्या काळामध्ये आम्ही माहिती द्यायचो आणि त्यानंतर छापे पडायचे. त्या छाप्यामध्ये आम्हाला दोन्हीबाजूने पैसे मिळायचे. तुम्ही थोडी मदत केली तर आपणही असे छापे मारु शकतो. त्यावेळी माझ्या पत्नीने याकडे लक्ष दिले नाही आणि या गोष्टी माझ्यासोबत बोलू नको असे सांगितले.”, असं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं आहे.

“त्यानंतर आपण हा धंदा केला तर फायदा होईल असे पुन्हा त्या मुलीने सांगितले. हे नाही तर माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी देते असेही त्या मुलीने सांगितले. पुन्हा माझ्या पत्नीने याबाबत मला सांगू नको असे सांगितले. पण वारंवार हा विषय यायला लागला तेव्हा माझ्या पत्नीने तिला फोनवर ब्लॉक केले. यानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन काही व्हिडीओ आणि क्लिप आल्या. त्यामध्ये तिने अमृता फडणवीस यांचे संभाषण रेकॉर्ड केले होते.”, असाही खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

”आम्हाला मदत करा” अशी धमकी दिली – देवेंद्र फडणवीस

यातल्या एका व्हिडीओमध्ये ही मुलगी बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरताना दिसत होती. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर धमक्या देण्यात आल्या की हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी धोक्यात येईल. माझे सगळ्या पक्षांसोबत संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा,” अशी धमकी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आरोपी फरार व्यक्तीचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. राजकारणात आपण कुठल्या पातळीवर चाललो आहोत याचा विचार कधीतरी करायला लागेल.”, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

“माझ्या कुटुंबाविरोधात असा ट्रॅप तयार केला गेला”  ( Trap against family )

“एक मुलगी माझ्या पत्नीशी बोलतानाचा व्हिडीओ केले आहेत. त्यावेळी त्यामध्ये ती मुलगी फक्त कॅमेरासमोर येत डॉलर दाखवून म्हणत होती, ‘मी आता हे त्यांना देणार आहे’ दिले तर नाहीतच कोणत्याच व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह असं काही सापडलं नाही. म्हणून माझ्या कुटुंबाविरोधात असा ट्रॅप तयार केला गेला. मात्र फॉरन्सिक ऑडिटमध्ये तेही सिद्ध झालं आहे. वाईट याचं वाटतं की राजकारण कोणत्या पातळीला जातंय. यामध्ये राजकीय हात आहे की नाही हे मी आज सांगू शकत नाही”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

A trap, a money bag, and a threat to ruin his political career

महत्वाच्या बातम्या-