Budget Travel Tips | कमी बजेटमध्ये ट्रिप प्लान करत असाल, तर उत्तराखंडमधील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Budget Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक वीकेंडला मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असतात. मात्र, बजेटमुळे अनेकदा या ट्रिप कॅन्सल कराव्या लागतात. पण भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहे, जिथे तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये फिरायला जाऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये तुमचा वीकेंड साजरा करू शकतात. त्यामुळे तुम्ही पण जर कमी बजेटमध्ये ट्रिप प्लान करत असाल, तर तुम्ही उत्तराखंडमधील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

ऋषिकेश

ऋषिकेश हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. या ठिकाणी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. ऋषिकेशमध्ये तुम्हाला राहण्यासाठी अनेक विनामूल्य आश्रम उपलब्ध आहे. त्यामुळे ऋषिकेशमध्ये तुमची ट्रिप कमी बजेटमध्ये होऊ शकते. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघायला मिळतील. त्याचबरोबर ऋषिकेशमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंग, बंजी जम्पिंग, कॅम्पिंग इत्यादी गोष्टी करू शकतात.

भीमताल

तुम्ही जर कमी बजेटमध्ये फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही भीमतालला नक्की भेट दिली पाहिजे. भीमताल हे एक निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही निवांत वीकेंड साजरा करू शकतात.

अल्मोडा

कमी बजेटमध्ये भेट देण्यासाठी अल्मोडा आहे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. कुमाऊँच्या टेकड्यांमध्ये वसलेले हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक आकर्षक मंदिर बघायला मिळतील. तुम्ही जर तुमचा वीकेंड कमी बजेटमध्ये प्लॅन करत असाल, तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.