राज्यात नवे निर्बंध लागू, बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमांना मुरड घालायला हवी; अजित पवारांचे आवाहन

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत सध्या ५ हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आता वाढताना दिसत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही काही मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.

यानंतर काल ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केले आहेत. तसेच राज्यात नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतींचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर अजित पवारांनी या शर्यतींबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. करोनामुळे राज्यावर आलेलं संकट मोठं असून आपण अशा शर्यतीच्या कार्यक्रमांना मुरड घालायला हवी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं.

“कुणीही व्यक्ती असली तरी, हे जगावर आलेलं मोठं संकट आहे. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढा. राज्याचे प्रमुख या नात्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी”, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या