अमॅझोन वर बंपर धमाका

नवरात्र निमित्तानं Amazon अॅपवर 4 दिवसांचा सेल होता. आता पुन्हा एकदा Amazon आपल्या ग्राहकांसाठी 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर तब्बल 5 दिवस बंपर धमाका घेऊन आलं आहे. यामध्ये मोबाईल, फ्रीज, टीव्ही, घरातील समाना, कपडे, सौंदर्य प्रसाधनं यांच्यावर Amazonकडून यावेळी मोठी सूट देण्यात आली आहे. अब खुशयों के बीज बजेट ना आएगा या टॅगलाईनने अमेझॉनने दिवाळीआधी ग्राहकांसाठी महागड्या वस्तू ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध करून दिल्या आहेत. हा सेल 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही नो कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर, शिवाय आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर किमान 10 टक्के सूट, Amazon Pay अॅपवरून पैसे दिल्यास 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Redmi 7A: शायोमीचा Redmi 7A फोन Amazon सेलमध्ये तुम्हाला 4,499 रुपयांपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. इतकच नाही तर खास त्या फोनसोबत 2 वर्षांची वॉरंटी तुम्हाला दिली जाणार आहे.

Loading...

Redmi 7: कमी बजेटमध्ये सर्वात उत्तम आणि जास्त फिचर असणारा फोन म्हणून Redmi 7 मोबाईलकडे पाहिलं जातं. शायोमी कंपनीचा हा फोन तुम्हाला सेलमध्ये फक्त 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy M30: 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये चांगला आणि ब्रान्डेड फोन हवा असेल तर Samsung Galaxy M30 घेण्याचा विचार करा. हा फोन तुम्हाला 9,999 रुपयांमध्ये Amazon सेलमध्ये उपलब्ध होणार आहे.

Oppo Reno 2Z: तुम्ही सॅमसंग आणि एमआयचे फोन सोडून इतर ब्रॅण्डचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर Oppo Reno 2Z हा फोन 29,900 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनवर तुम्हाला 4,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सही मिळणार आहेत.

iPhone 6s: ज्यांना अॅपलचा फोन घ्यायचा आहे त्यांनी iPhone 6sचा विचार करायला हरकत नाही. या फोनची किंमत 23 हजार 999 रुपये असून या फोनमध्ये तुम्हाला लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम iOS 13 मिळणार आहे.

Samsung Galaxy Note 10: तुम्ही जर Samsung Galaxy Note 10 घेण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Indian Sale ही संधी सोडू नका. या सेलमध्ये तुम्हाला 6000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. ह्या फोनची किंमत 85000 रुपये आहे तर तुम्हाला हा फोन 79, 999 रुपयांमध्ये मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.