सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे ; नारायण राणे 

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

यावर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर आंदोलनाबाबत ट्विट केल्यामुळे सचिनवर देशभरातून टीका होताना दिसत आहे. मात्र भाजप नेत्यांनी सचिनची बाजु लावून धरली आहे. अशातच भाजप नेते नारायण राणेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.  राणे पत्रकार परषदेत बोलत होते. राणेंच्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही सचिनवर होत असलेल्या टीकेवरून राज्य सरकारला सवाल केला होता.

केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?,असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा