InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी मुंबईतील मुख्यालय विकणार

सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी हे सध्या कर्जाच्या विळख्यात अडकले असून मुंबईतील मुख्यालय विकण्याच्या तयारीत आहे. ब्लॅकस्टोनसह काही जागतिक कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे.

अनिल अंबानी पुन्हा दक्षिण मुंबईतील बॅलॉर्ड एस्टेटमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील मुख्यालय विकून किंवा भाडेतत्त्वावर देऊन कंपनीवरील कर्ज कमी करण्याचा अंबानी यांचा विचार आहे. रिलायन्स कॅपिटलवर १८ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात यातील ५० टक्के कर्जाची परतफेड करण्याचा मानस अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता.

सांताक्रूझमध्ये असणारं रिलासन्स सेंटर ७ लाख चौरस फुटांचं आहे. या ऑफिसच्या विक्रीतून अंबानींना दीड ते दोन हजार कोटी रुपये मिळू शकतात. अनिल अंबानी यांचा रिलायन्स समूह त्यांच्याकडे असणाऱ्या स्थावर मालमत्ता विकून जास्तीत जास्त कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंबानी यांच्यावर असलेल्या कर्जामुळे अर्थ क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी त्यांचं क्रेडिट रेटिंग कमी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

मेटेनंतर आता विनोद पाटीलांच्या उदयाची चर्चा 

मोहन भागवत यांच्यासह संघाचे दिग्गजही ट्विटरवर

खासगी गाडीवर ‘पोलीस’ आता पोलीस लिहता येणार नाही

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- अजित पवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply