..तर आता किल्ल्यात तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का?

भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारी ऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

भाजप कारखाणदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात. शेतकऱ्यांनी यांचे काय घोडे मारले? असा सवाल राष्टवादीचे नेते शरद पवार यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू आहे. त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी झोपेत आहेत का, हे समजायला कारण नाही. 370 रद्द केले त्यांचे अभिनंदन मग 371 नुसार नागालंड, मणिपूर व इतर आठ राज्यात देशातील इतर राज्यातील नागरिक जमीन घेऊ शकत नाही. तेथे बदल का नाही? एका धर्माचे लोक राहतात. म्हणून काश्मिरला 370 कलम रद्द केले? असा सवालही पवार यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.