…पण पवारसाहेब कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मुंबई : नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी यावेळी बोलताना केलं होत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, असंही शरद पवार म्हणाले. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फरक हा आहे की, मी चाळीस वर्षानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठे नेते आहेत. परंतु ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. परंतु त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी अडीच वर्षे, कधी दीड वर्षे असं मुख्यमंत्रिपदावर राहावं लागलं. परंतु एका गोष्टीचं मला समाधान आहे, की मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे, हे पाहून संपूर्ण महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे, हीच कामाची पावती आहे, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा