…पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, नाना पटोलेंच्या टीकेला शिवसेनेचं उत्तर

देशातील पाच राज्यामधील निवडणुकीच्या निकालावर काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काँग्रेसला कमी जागा मिळाल्यावर एक वक्तव्य केले होतं. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते की, “संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना पेपरदेखील वाचत नाही,” दरम्यान नाना पटोले यांच्या या वक्तव्याला शिवसेनेने उत्तर दिलं आहे.

“महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने नाना पटोले यांना सामनातुन लगावला आहे.

“काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“पश्चिम बंगालात पक्षाला खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा