InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पैसा आणि बळाचा वापर करून भाजप आमदारांची खरेदी करत -दिग्विजय सिंह

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी कर्नाटकातल्या घडामोडींवर मोठा गौप्यस्फोट केलाय. नोटबंदीच्या काळात भाजपने जो पैसा कमावला होता त्याचा वापर आता करण्यात येतोय असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय. पैसा आणि बळाचा वापर करून भाजप आमदारांची खरेदी करत असल्याचं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. दिग्विजय सिंह हे दरवर्षी आषाढीला पंढरपूरला येत असतात. त्यावेळी पुण्यात थांबले असता त्यांनी हे गंभीर आरोप केलेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा पराभव भोपाळ मतदारसंघातून केला होता. भाजपचं जागासंबंधीचं भाकित दरवेळी खरंच कसं ठरतं असा सवाल करत त्यांनी EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.