आंदोलन करून तुम्ही दुहीची बीजे पेरली ; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

रोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने राज्यभर ‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे आंदोलन केलं. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले. भाजपच्या याच आंदोलनाचा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

कुशल पंजाबीच्या आत्महत्येचा सुसाईड नोटमधून झाला उलगडा

संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची असताना महाराष्ट्रद्रोही भाजपने आंदोलन करून दुहीची बीजे पेरली, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली आहे.

Loading...

पंतप्रधानांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावे ; फडणविसांचा शरद पवारांना टोला

कोोरनासारख्या जागतिक संकटाच्या काळात भाजपने महाविकास आघाडीविरोधात केलेलं आंदोलन जनता कधीही विसरणार नाही आणि जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.