InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला

- Advertisement -

मुंबई- राज्यात २३ जून २०१९ ला ९ महानगरपालिका, २२ नगरपरिषद, ७ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीची पोटनिवडणूक होणार आहे. याच दिवशी (दि. २३) नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षाचीही पोटनिवडणुकीद्वारे निवड होईल. या सर्व निवडणुकांचे निकाल २४ जून २०१९ घोषित होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

नवनिर्मित बुटीबोरी नगरपरिषदेची होणार सार्वत्रिक निवडणूक

महानगरपालिका

पोटनिवडणूक होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महानगरपालिकांमधील १५ रिक्तपदांचा समावेश आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे ३० मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत दाखल करता येतील. २ व ५जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ जून २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १० जून २०१९ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ११ जून २०१९ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २३ मे २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: उल्हासनगर- १ब आणि ५अ, नवी मुंबई- २९, कल्याण-डोंबिवली- २६, पुणे- ४२अ, ४२ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), आणि १अ, कोल्हापूर- २८ आणि ५५, नाशिक- १० ड, मालेगाव- ६क, परभणी- ११अ आणि 3ड व चंद्रपूर- ६ब आणि १३ब.

नगर परिषद

नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील २३ रिक्तपदाच्या; तर मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान व २४ जून २०१९ रोजी मतमोजणी होईल.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे ३० मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत दाखल करता येतील. २ व ५ जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ जून २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी १३ जून २०१९ ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होईल.

- Advertisement -

नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- ५ ब, दुधनी (सोलापूर)- २ अ, नांदगाव (नाशिक)- ७ ब, देवळा (नाशिक)- ११, श्रीरामपूर (अहमदनगर)- ९ ब, संगमनेर (अहमदनगर)- १० अ, जामखेड (अहमदनगर)- १४, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- ८ अ, सोयगाव (औरंगाबाद)- १६, अंबाजोगाई (बीड)- ४ अ, सोनपेठ (परभणी)- १ ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- ११ ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- ८ अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- ४, ९ व १२, लाखांदूर (भंडारा)- १६, देवरी (गोंदिया)- ११, कोरपना (चंद्रपूर)- १५, मूल (चंद्रपूर)- ६ अ, भामरागड (गडचिरोली)- ५ आणि भामरागड (गडचिरोली)- १६.

जिल्हा परिषदा व पंचायत समिती

रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध १६ पंचायत समित्यांमधील १६ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता २३ जून २०१९ मतदान; तर २४ जून २०१९ रोजी मतमोजणी होईल.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३ ते ८ जून २०१९ या कालावधीत स्वीकारली जातील. ५ जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

नामनिर्देशनपत्रे सादर करणे- ३ ते ८ जून २०१९
नामनिर्देशनपत्रांची छाननी- १० जून २०१९
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- १५ जून २०१९
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १९ जून २०१९
मतदानाचा दिनांक- २३ जून २०१९
मतमोजणीचा दिनांक- २४ जून २०१९

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.