By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

By Poll Election | पुणे : अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची तुफान चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.  त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली. पण या महाविकास स्थानिक प्रभावी नेते राहुल कलाटेंनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने मोठी ठिणगी पडल्याचे दिसत आहे.

“राहुल कलाटे यांची नाराजी”

राहुल कलाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना दिलेल्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. “शेवटच्या क्षणापर्यंत मला अपेक्षा होती की मागील ट्रॅक रेकॉर्ड पाहून किंवा या शहरातल्या जनतेनं 2014 आणि 2019 मध्ये कुठल्या उमेदवारावर भरभरून प्रेम केलंय, ते पाहाता महाविकास आघाडी निर्णय घेईल अशी मला अपेक्षा होती. पण आता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे”, असे म्हणत राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे.

“मला 100 टक्के विजयाची खात्री आहे. 2019लाही 1 लाख 12 हजार लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. आता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात लोक माझ्यासोबत राहतील.माझी सुरुवातीपासून भूमिका अशी होती की महाविकास आघाडीत कुणालाही जागा गेली, तरी ही निवडणूक मी लढवेन. कारण मागील इतिहास पाहिला आणि या शहरात माझा गेल्या 5 वर्षांत झालेला जनसंपर्क, कोविड काळातील माझं काम पाहाता मला अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून माझ्या नावाचा नक्कीच विचार होईल”, असं म्हणत राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बंडखोरीचं कारण काय?

2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यासमोर राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांनीही चांगली टक्कर दिली होती. त्यावेळीही राहुल कलाटे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा राहुल कलाटेंना 1 लाख 12 हजार मतं मिळाली होती. त्याच जोरावर यंदा उमेदवारीसाठी आपला विचार होईल, अशी शक्यता राहुल कलाटेंना वाटत होती. मविआमध्ये जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मागून घेतली होती. त्यानुसार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा कलाटेंना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कलाटेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या-