Cabinet Expansion | आज होणार मंत्रिमंडळ विस्तार? मुख्यमंत्र्यांच्या बैठका पुढे ढकल्यामुळे चर्चांना उधाण

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू असताना याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आज होऊ शकतो, अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे.

Cabinet expansion is expected today

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या गेल्या तीन चार दिवसापासून बैठका सुरू आहे. या बैठकांमध्ये खाते वाटप त्याचबरोबर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच खातेवाटपही केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आज राजभवनावर शपथविधी (Cabinet Expansion)  होणार असल्याचं बोललं जात आहे. आज होणाऱ्या शपथविधीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करत चाळीस आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांच्या नऊ आमदारांच्या शपथविधी झाला. या घटनेनंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) प्रत्येकजण प्रतीक्षा करत आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NRkHfH

You might also like

Comments are closed.