Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
Cabinet Expansion | दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यांच्या या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
काल दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जवळपास दोन तास अमित शाह यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) ही चर्चा झाली असल्याची अपडेट समोर आली आहे.
Give opportunity to new and young faces in cabinet expansion
नवीन आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) संधी द्या, अशा सूचना शाह यांनी शिंदे-फडणवीस यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर वाचाळवीरांना मंत्रिमंडळ विस्तारापासून दूर ठेवण्याचे आदेश अमित शाह यांनी दिल्याचे माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला जाणार आहे. यामध्ये शिंदे गटातील दोन खासदारांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महिला आमदारांना देखील यामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी
- Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं
- Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका
- Dress Code In Temple | राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड हवा; मंदिर ड्रेस कोड प्रकरणामध्ये विश्व हिंदू परिषदेची उडी
- Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ORKwyh
Comments are closed.