Cabinet Expansion | मंत्रिमंडळात कुणाला मिळणार किती जागा? जाणून घ्या सविस्तर

Cabinet Expansion | मुंबई: काल (12 जुलै) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील आमदारांना स्थान मिळणार असून त्याचा फॉर्मुलाही निश्चित झाला असल्याची माहिती साम टीव्ही न्यूजनं दिली आहे.

10 ministers can take oath

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रीमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) तिन्ही पक्षांचा फॉर्म्युला 4-4-2 असा असू शकतो. यामध्ये भाजपचे 4, शिंदे गटाचे 4, आणि अजित पवार गटाचे 2 मंत्री असू शकतात. यावरून एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं  बोललं जात आहे.

याआधी शिवसेनेच्या 9, भाजपच्या 9, आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या शपथविधी झाला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आलेले नाही. अशात आणखी 10 नव्या आमदारांचा शपथविधी (Cabinet Expansion) होणार आहे. यानंतर मंत्रिमंडळात भाजपचे 13, शिंदे गटाचे 13 आणि अजित पवार गटाचे 11 मंत्री असतील.

दरम्यान, आज किंवा उद्या कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या (Cabinet Expansion) चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांची तातडीने वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. शिंदे गटातील चार आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिंदे गटातील भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. तसेच संजय रायमुलकर आणि संजय शिरसाट या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात सामील होण्याची संधी मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JWxBrg