Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला! तर खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास दहा दिवस झाले आहे. मात्र अद्यापही नवीन सरकारच्या खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिपदावरून शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाच्या दररोज बैठक होत आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Cabinet will be expanded after the monsoon session

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडं (Cabinet Expansion) लक्ष लावून बसले आहेत. मात्र, यासाठी त्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. कारण पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज किंवा उद्या खातेवाटप होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काल (12 जुलै) खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्यांच्या या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात होतं. मात्र, नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखीन वाट पहावी लागणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) तिन्ही पक्षांचा फॉर्म्युला 4-4-2 असू शकतो. यामध्ये शिंदे गटाचे 4, भाजपचे 4, आणि अजित पवार गटाचे 2 मंत्री असू शकतात. यावरून एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळात भाजपचे 13, शिंदे गटाचे 13 आणि अजित पवार गटाचे 11 मंत्री असतील.

दरम्यान, शिंदे गटातील चार आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यामध्ये योगेश कदम, अनिल बाबर, भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच संजय शिरसाट आणि संजय रायमुलकर या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PPr2uB

You might also like

Comments are closed.