InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गोव्यात मंत्रिमंडळाचा विस्तार; बाबू कवळेकर यांच्यासह चार जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आज गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या तीन आमदारांसोबत एकूण चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्याआधी मंत्रिमंडळात सहभागी असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिले होते.

दरम्यान आज दुपारी झालेल्या शपथविधीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणारे बाबू कवळेकर, फिलीप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह मायकल लोबो यांनी आज दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply