येत्या दोन दिवसांत ठाकरे सरकारचे खातेवाटप – छगन भुजबळ

निवडणुकीचे निकाल लागल्यापासून छगन भुजबळ येवल्यात आले नव्हते. ते आता कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊनच येवल्यात आले. भुजबळ येताच महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करून लक्ष वेधले.

यावेळी भुजबळ म्हणाले की, मागच्या पन्नास वर्षांपासून मी राजकारणात आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मी त्या पक्षात होतो, खूप कामं केली, त्याचे काही चांगले फळ मला मिळाले, वाईटही मिळाले; पण मी आशावादी आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल का, असे विचारताच भुजबळांनी फडवणीसांना टोला लगावला, ते म्हणाले की, हे फडवणीस यांचे सरकार नसून सकाळी आले आणि दुपारी गेले असे होणार नाही. पाच वर्षे आनंदाने हे चालेल. गेल्या दोन महिन्यांपूर्वी भाजपने शिवसेनेला दिलेले शब्द पाळले नाहीत, उद्धव ठाकरे साहेबांनी युती सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणून आम्ही सरकार स्थापन केलं. येत्या दोन दिवसांतच खाते वाटप होत आहे, असेही भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.