InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

- Advertisement -

कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. हे मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी येथी मोठे राजकीय नाट्य रंगले होते. यानंतर येडीयुरप्पांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. जवळपास महिनाभरानंतर येथील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत मिळाले नव्हते. यामुळे येडीयुराप्पा यांना स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर काँग्रेस, जेडीएसने आघाडी केली. कुमारस्वामींना पाठिंबा देण्यात आला होता.  मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्रास दिला जात होता. यामुळे गेल्याच महिन्यात काँग्रेसचे 12 आणि जेडीएसचे 3 आमदारांनी बंड करून राजीनामे दिले होते. 

आता नव्याने मुख्यमंत्री बनलेल्या भाजपाच्या येडीयुराप्पा यांनी आज मंत्रीमंडळ विस्तार केला आहे. त्यांनाही मंत्रीमंडळ विस्ताराची भीती सतावत होती. अखेर रविवारी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यपाल विजुभाई वाला यांच्याकडे 17 मंत्र्यांच्या नावाची यादी सोपविली. यामध्ये भाजपाचे काही जुने नेते, येडीयुराप्पांच्या आधीच्या सरकारमध्ये असलेले काही नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.