InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

खोटी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा

- Advertisement -

जिंतूर नगर परिषदेतील कर्मचारी दत्तराव तळेकर यांना घरी बोलावून बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्या सांगण्यावरून खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. ही अ‍ॅट्रॉसिटी रद्द करावी, अन्यथा उद्या 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संभाजीसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

शुक्रवार, 5 जुलै रोजी राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर नगरपालिकेचे कर्मचारी दत्तराव तळेकर यांना घरी बोलाविले आणि आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाणही केली. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करता, उलट आमदार भांबळे यांच्या सांगण्यावरुन दत्तराव तळेकर यांच्यावर खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दत्तराव तळेकर आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड भयभित झाले आहेत. यापूर्वी देखील आमदार भांबळे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.