Cancer Pain | कॅन्सरमध्ये शरीरातील ‘या’ भागांमध्ये होतात वेदना

टीम महाराष्ट्र देशा: कर्करोग (Cancer) हा एक गंभीर आजार आहे. कर्करोग जेव्हा संपूर्ण शरीरामध्ये पसरतो तेव्हा हळूहळू वेदना जाणवायला लागतात. परंतु काही वेळा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शरीराच्या अनेक भागांमध्ये वेदना जाणवायला सुरुवात होते. अनेकदा त्या वेदना असह्य होतात. त्याचबरोबर अनेकवेळा शरीरातील काही भागांच्या दुखापतीमुळे कॅन्सर झाल्याची माहिती होते. कर्करोग कोणताही असो किंवा आकाराने लहान असो. त्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब पडून वेदना व्हायला लागतात. पोट, पाठ, पाठीचा कणा आणि हाडे दुखणे ही देखील कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

कर्करोग जेव्हा मेटाटेस्टिंग होतो किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. तेव्हा मज्जा संस्थेवर दबाव येऊन कर्करोगाच्या वेदना पहिल्यांदा जाणवायला लागतात. कर्करोग आकाराने जरी लहान असला तरी त्याचा पाठीच्या कण्यावर आणि मज्जातंतूवर दाब पडून वेदना होतात. रेडिओथेरपी नंतरही या वेदनात जाणवू शकतात. तर काही रुग्णांना केमोथेरपी नंतरही या वेदना होऊ शकतात. त्याचबरोबर काहींना शस्त्रक्रिया नंतर देखील वेदना जाणवायला सुरुवात होऊ शकते.

कॅन्सर (Cancer) मध्ये शरीरातील ‘या’ भागांमध्ये होतात वेदना

पाठ

तुम्हाला जर सतत पाठ दुखी होत असेल तर तुम्हाला काळजी घेणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मणक्याच्या हाडांमधील वेदना देखील वाढतात. स्तनाच्या कर्करोगात आणि फुप्फुसाच्या कर्करोगात पाठदुखीची वेदना वाढू शकते.

पोट

पोटाच्या कॅन्सर असेल तर पोट दुखीच्या तक्रारी सतत निर्माण होतात. त्याचबरोबर कधीही पोटात अचानक दुखायला लागते. पोटाच्या कॅन्सरमध्ये थकवाही अधिक जाणवतो.

फुफ्फुसांमधील कर्करोग

फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे श्वसनक्रियेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. फुफ्फुसांमधील कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. ज्याच्या मणक्यामध्ये पसरण्याचा धोका सर्वात जास्त निर्माण होतो. हा कर्करोग मणक्यामध्ये पसरण्याचा जास्त धोका असतो. यामध्ये पाठीच्या खालच्या भागात दुखणे थकवा येणे श्वास लागणे खोकल्याद्वारे रक्त येणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात.

टीप: वरील माहितीबद्दल संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.