InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शहराबाहेरील मतदार आणण्यासाठी उमेदवारांची धडपड

- Advertisement -

विधानसभेचा प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून याप्रमाणे मतदारसंघात पिंजून काढत प्रचार केला. त्यानंतर आता शहराबाहेर असलेल्या मतदारांना आणण्याची धडपड उमेदवारां तर्फे केली जात आहे.

औरंगाबादेतून शहराबाहेर नोकरी व इतर कामासाठी 50 हजाराहून अधिक लोक बाहेर राहतात. याच लोकांना आणण्यासाठी उमेदवारां तर्फे नियोजन केले जात आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगातर्फे ही जनजागृती केली जात आहे. प्रत्येकानी मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान निवडणूक आयोग करत आहे.

Loading...

उमेदवारां तर्फे ही शहराबाहेर राहणाऱ्यांसाठी वाहनाची नियोजन करण्यात आले आहेत व गेल्या चार-पाच दिवसांपासून या  मतदारांच्या संपर्कात हे उमेदवार आहेत. यात प्रामुख्याने पुणे-मुंबई यासह विविध शहरात हे मतदार राहतात यांच्यासाठी वाहनाचे नियोजन करण्यात आले आहेत.

- Advertisement -

Loading...

प्रचार संपण्यापूर्वीच काही मतदार पुणे मुंबईहून औरंगाबादेत दाखल झाले आहेत. मराठवाड्यातून नोकरी व शिक्षणासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर पुण्याला गेले आहेत आणि निवडणुकीसाठी हेच शनिवार-रविवार आपल्या मतदारसंघात कडे येत आहेत.प्रत्येक उमेदवारासाठी एक महत्त्वाचा असल्यामुळे उमेदवारही बाहेर राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.