InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठी मुलीचा सातासमुद्रापार झेंडा, ‘अशी’ कामगिरी करणारी जगातील पहिली महिला

मुंबईच्या आरोही पंडीतने अटलांटिक महासागर एकटीनं पार करत सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकावला आहे.  23 वर्षीय आरोही अटलांटिक महासागर पार करणाऱी जगातील पहिली महिला ठरली आहे.

आरोहीने एका लहान विमानातून 3 हजार किलोमीटर अंतर पार करत इकालुइट विमानतळावर पोहोचली. दरम्यान ती ग्रीनलँडसह दोन ठिकाणी थांबली होती. यासाठी तिने तब्बल सात महिने प्रक्षिक्षण घेतलं होतं.

आरोही एलएसए परवानाधारक असून तीने भारतातून विमानोड्डाण केले होते. ती पंजाब, राजस्थान, गुजरातच्या वरून पाकिस्तानात पोहोचली होती. यावेळी 1947 नंतर एलएसए विमान उतरवणारी ती पहिली शेजारी देशातील नागरिक ठरली होती. कॅनडातही तिने विमान उतरवले होते. या प्रवासादरम्यान आरोहीने विश्वविक्रम केला आहे. ती भारतात परत येईपर्यंत आणखी काही विक्रम नावावर करेल. , असे एसेसे या सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply